मंगळवेढ्याचा अभिमान; श्री. देवेंद्र नेने यांनी बनवला सीएनजीवर चालणारा ट्रॅक्टर !

आपल्या मंगळवेढ्याचे सुपुत्र श्री. देवेंद्र रघुनाथ नेने यांनी सीएनजीवर चालणारा ट्रॅक्टर तयार केल्याची बातमी ऐकून मला खूप आनंद आणि अभिमान वाटला. नागपूर येथे या ट्रॅक्टरचे उद्घाटन केंद्रीय मंत्री मा.श्री. नितीन गडकरीजी आणि केंद्रीय कृषिमंत्री मा.श्री. शिवराजसिंग चव्हाणजी यांच्या हस्ते झाले, ही आपल्या सर्वांसाठी विशेषतः मंगळवेढाकरांसाठी मोठी गौरवाची बाब आहे.
देवेंद्र सध्या अलवर येथे टॅफे आणि आयशर कंपनीच्या इंजिन डिझाइन विभागात इंजिनियर म्हणून काम करतात. ग्रामीण भागात जन्मलेल्या श्री. देवेंद्र यांनी मोठी स्वप्नं पाहून आपल्या मेहनतीतून आणि तांत्रिक कौशल्यातून केलेले हे काम येत्या काळात कृषी क्षेत्रासाठी अत्यंत महत्त्वाचे ठरेल, याची मला खात्री आहे.
आपल्या मंगळवेढ्यातून असे नावीन्यपूर्ण काम करणारे युवक पुढे येतात, तेव्हा मनापासून समाधान वाटते. देवेंद्रला मनःपूर्वक अभिनंदन आणि त्याच्या पुढील वाटचालीसाठी खूप-खूप शुभेच्छा !
#मंगळवेढा #DevendraNene #CNGTractor #Innovation #Proud #Mangalwedha #Nagpur

दक्षता उपसंपादक:राजन क्षत्रिय