spot_img
spot_img
spot_img
spot_img

अंध महिलांच्या टी-ट्वेंटी विश्वचषक क्रिकेट स्पर्धेत भारत विश्वविजेता  सोलापूरच्या गंगा कदमची उमटली मोहोर

अंध महिलांच्या टी-ट्वेंटी विश्वचषक क्रिकेट स्पर्धेत भारत विश्वविजेता

सोलापूरच्या गंगा कदमची उमटली मोहोर

 

सोलापूर प्रतिनिधी

अंध महिलांच्या t-20 विश्वचषक क्रिकेट स्पर्धेत भारतीय संघाने नेपाळ संघाचा सात गडी राखून पराभव करत t20 विश्वचषकावर भारताचे नाव कोरले. यामध्ये सोलापूरच्या गंगा कदम हिने या विश्वचषकावरती आपली मोहोर उमटवली आहे.

गंगा कदम हिने संपूर्ण स्पर्धेत उत्तम गोलंदाजी व अप्रतिम क्षेत्ररक्षण केले. या संपूर्ण स्पर्धेमध्ये तिने एकूण तीन गडी बाद केले तर सहागडी धावबाद केले. विश्वचषकाच्या पहिल्याच सामन्यात ती सामनाविर ठरली होती.

 

भारतीय अंध महिलांच्या संघाने उपांत्य फेरीमध्ये ऑस्ट्रेलिया संघाचा नऊ गडी राखून पराभव केला. नाणेफेक जिंकून प्रथम क्षेत्ररक्षण करताना भारतीय संघाने ऑस्ट्रेलिया संघास 109/9 धावत रोखले व हे लक्ष भारतीय संघाने 11.5 षटकात एक गडाच्या मोबदल्यात पूर्ण केले. यात सलामीला फलंदाजीस आलेली सोलापूरच्या गंगा कदम हिने 31 चेंडूत 3 चौकारांच्या सहाय्याने नाबाद 41 धावा केल्या. गोलंदाजी करताना गंगा हिने 2 षटकात 1 षटक निर्धाव टाकत केवळ 5 धावा दिल्या. भारताच्या विजयात तिची ही चमकदार कामगिरी मोलाची ठरली होती. गंगा कदमची ही चमकदार कामगिरीच आज विश्व विजेत्या चषकापर्यंत भारताला घेऊन गेली आहे.

 

चौकट

गंगा कदमने माझे स्वप्न साकार केले.

 

भारताच्या विश्वचषक विजयात माझी शिष्य असलेल्या गंगा कदम हिचा बहुमूल्य वाटा आहे. एक प्रशिक्षक म्हणून तिच्या माध्यमातून माझे विश्वचषक जिंकण्याचे स्वप्नपूर्ती झाल्याची अनुभूती मला आज होत आहे.

राजू शेळके , प्रशिक्षक गंगा कदम.

 

गंगा कदम ही अंध खेळाडू आपल्या सोलापूरची आहे . तिचे वडील हे दुसऱ्याच्या शेतामध्ये सालगडी म्हणून मजुरी करतात. अशा या कष्टकऱ्यांच्या कन्येने क्रिकेटच्या माध्यमातून भारताचा झेंडा विश्वचषकापर्यंत नेला असल्याचा अभिमान आपल्या तमाम सोलापूरकरांना आहे.

 

दक्षता उपसंपादक:राजन क्षत्रिय

Related Articles

सोलापूर शहर महानगरपालिका निवडणुकीच्या अनुषंगाने तयार करण्यात आलेल्या जाहीरनाम्याचे प्रकाशन राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे प्रदेशाध्यक्ष, खासदार श्री सुनील तटकरे साहेब, राष्ट्रवादी महिला काँग्रेस पार्टी प्रदेशाध्यक्षा...

*जिल्हा मेळावा मध्ये महाराष्ट्र विद्यालयाचे घवघवीत यश* 

*जिल्हा मेळावा मध्ये महाराष्ट्र विद्यालयाचे घवघवीत यश* सोलापूर भारत स्काऊट गाईड यांच्यावतीने कर्मवीर विद्यालय चारे या ठिकाणी जिल्हा स्काऊट गाईड मेळावा संपन्न झाला. या जिल्हा...

spot_img

ताज्या बातम्या

error: Content is protected !!