spot_img
spot_img
spot_img
spot_img

मंत्रालय – मुंबई – 11 नोव्हेंबर 2025

मंत्रालय – मुंबई – 11 नोव्हेंबर 2025

 

माझ्या माण – खटाव विधानसभा मतदारसंघातील 21 गावांना संपूर्णपणे दुष्काळमुक्त करण्यासाठी महत्वपूर्ण अशी असलेली औंध उपसा सिंचन योजनेच्या निविदाबाबत आणि सोलापूर जिल्ह्यातील रिटेवाडी उपसा सिंचन योजनेच्या कामाबाबत राज्याचे जलसंपदा मंत्री (गोदावरी व कृष्णा खोरे विकास महामंडळ) नामदार मा.श्री. राधाकृष्ण विखे – पाटील साहेब यांच्या प्रमुख उपस्थितीत बैठक संपन्न झाली.

 

या बैठकीत औंध उपसा सिंचन योजनेच्या निविदाबाबत आणि सोलापूर जिल्ह्यातील रिटेवाडी उपसा सिंचन योजनेच्या कामाबाबत आढावा घेत,सविस्तर चर्चा केली. याप्रसंगी या दोन्ही योजनेचे उपरोक्त सर्व विषय मार्गी लागतील अशा पाद्धतीने त्वरित कार्यवाही करण्याच्या स्पष्ट सूचना संबंधित विभागांच्या अधिकाऱ्यांना दिल्या आहेत.

 

औंध उपसा सिंचन योजना खटाव तालुक्यातील औंधसह 21 गावांच्या जनतेसाठी शेतकऱ्यांसाठी, आणि रिटेवाडी उपसा सिंचन योजना ही सोलापूर जिल्ह्यातील शेतकऱ्यांसाठी जीवनवाहिनी ठरणारी महत्त्वाची योजना असून, या योजनांच्या माध्यमातून हजारो हेक्टर शेतीला पाणीपुरवठा होणार आहे. या योजनेची कामे जलदगतीने पूर्ण होऊन लाभार्थी शेतकऱ्यांपर्यंत तिचा फायदा पोहोचावा, यासाठी राज्य शासन व प्रशासन प्रयत्नशील आहे.

 

दक्षता उपसंपादक:राजन क्षत्रिय

Related Articles

महाराष्ट्र विद्यालय बार्शीचे एन एम एम एस परीक्षेत घवघवीत यश

*महाराष्ट्र विद्यालय बार्शीचे एन एम एम एस परीक्षेत घवघवीत यश*   मंगळवार दिनांक २४ फेब्रुवारी २०२६ रोजी एन.एम.एम.एस. परीक्षेचा निकाल जाहीर झाला असून, महाराष्ट्र विद्यालय बार्शी...

अक्षय तृतीयेपूर्वी बसवेश्वर महाराजांचा पुतळा बसवण्याचे निर्देश

अक्षय तृतीयेपूर्वी बसवेश्वर महाराजांचा पुतळा बसवण्याचे निर्देश   सोलापूर : महापौर श्री. विनायक कोंड्याल यांनी आज महात्मा बसवेश्वर महाराज पुतळा परिसराची प्रत्यक्ष पाहणी करून सुरू असलेल्या...

spot_img

ताज्या बातम्या

error: Content is protected !!