spot_img
spot_img
spot_img
spot_img

भाऊसाहेब गांधी जन्मशताब्दी निमित्त  वृक्षारोपण व स्वच्छता अभियानाला अभूतपूर्व प्रतिसाद

भाऊसाहेब गांधी जन्मशताब्दी निमित्त

वृक्षारोपण व स्वच्छता अभियानाला अभूतपूर्व प्रतिसाद

 

सोलापूर : श्रद्धेय भाऊसाहेब गांधी यांच्या, ‘जन्मशताब्दी वर्ष’ – प्रारंभानिमित्त आयोजित, ‘वृक्षारोपण’ व सामुदायिक ‘स्वच्छता’ अभियाना मध्ये, सोलापूरकरांच्या तसेच,वालचंद शिक्षण समूहातील माध्यमिक, कनिष्ठ, वरिष्ठ महाविद्यालयाच्या विविध विभागातील प्राचार्य, प्राध्यापक, विभाग प्रमुख, तसेच विद्यार्थी,शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी वृंद यांच्या उत्स्फूर्त सहभागामुळे अभूतपूर्व यश मिळवले. कडाक्याच्या थंडीची सकाळ असूनही,वालचंद इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजी (WIT) प्रांगणात सकाळी ठीक सात वाजता सुरू झालेल्या या उपक्रमात, भाऊसाहेबांच्या कार्याबद्दल नितांत श्रद्धा असणारे, सामाजिक, राजकीय, व्यापारी, धार्मिक क्षेत्रातील निमंत्रित मान्यवर नागरिक, विद्यार्थी, शिक्षकवर्ग, सामाजिक संस्थांचे कार्यकर्ते आणि वालचंद शिक्षण समूहातील सर्व सहकाऱ्यांनी मोठ्या संख्येने हजेरी लावली.

 

“संस्कारातून सेवा – सेवेतून शिक्षण”- या प्रेरणादायी घोषवाक्याखाली राबविण्यात आलेल्या या अभियानाचे औपचारिक उद्घाटन सोलापूर महानगरपालिकेचे आयुक्त डॉ. सचिन ओंबासे (IAS) यांच्या शुभ हस्त झाले. याप्रसंगी, अतिरिक्त आयुक्त सौ. वीणा पवार प्रमुख ‘अतिथी’ म्हणून,उपस्थित होत्या. तर, कार्यक्रमाचे अध्यक्षस्थान श्री भाऊसाहेब गांधी प्रतिष्ठानचे अध्यक्ष व वालचंद शिक्षण समूहाचे मानद सचिव डॉ. रणजित गांधी यांनी भूषविले.

‘वालचंद शिक्षण समूहाचे ‘विश्वस्त श्री. भूषण शहा, श्री पृथ्वीराज गांधी, श्री पराग शहा, श्री वैभव गांधी तसेच, भारत वर्षीय दिगंबर जैन तीर्थक्षेत्र कमिटीचे राष्ट्रीय अध्यक्ष अनिल जमगे, ‘भारतीय जैन संघटना’ राज्यअध्यक्ष केतन शहा आणि शहरातील विविध जैन मंदिरांचे विश्वस्त आणि मान्यवरांनीही उपस्थिती दर्शवून कार्यक्रमाची शोभा वाढवली.

 

उपक्रमाबद्दल बोलताना डॉ. सचिन ओंबासे म्हणाले, “वृक्षारोपण आणि स्वच्छता या केवळ पर्यावरणीय जबाबदाऱ्या नाहीत, तर त्या आपल्या संस्कार, सेवा आणि शिक्षण या मूल्यांना मजबूत करणाऱ्या आहेत. आज सोलापूरकरांनी दिलेला हा अभूतपूर्व प्रतिसाद हा भाऊसाहेब गांधी यांच्या कार्याला आणि विचारांना दिलेली खरी आदरांजली आहे.” आज स्वच्छता व वृक्षारोपण अभियानातील तरुणाईच्या सामूहिक सहभागामुळे संपूर्ण परिसर स्वच्छ, हरित आणि आरोग्यदायी बनेल अशी आशा व्यक्त केली. वालचंद शिक्षण समूहाने या अभूतपूर्व कार्यक्रमातून सोलापूर शहराला संघटितपणे कार्य करण्याची संघटित एकजूट वृत्ती, पर्यावरणप्रेम आणि सामाजिक जबाबदारी यांचा अनोखा’ संदेश’ दिला. शिस्त, वेळेचे अचूक नियोजन आणि समर्पित सेवाभाव या गुणांनी कार्यक्रमाची उंची वाढवली, अशा शब्दांत डॉ. ओंबासे यांनी अभियानाचे कौतुक केले.

 

अध्यक्षीय समारोपात डॉ. गांधी म्हणाले, जन्मशताब्दी वर्षानिमित्त राबवलेल्या या प्रारंभिक उपक्रमाने पुढील कैक पिढ्यांसाठी एक प्रेरणादायी आदर्श निर्माण केला असून, “संस्कारातून सेवा – सेवेतून शिक्षण”- श्रद्धेय भाऊसाहेबांच्या विचाराचा प्रभावी विचार सोलापूरकरांनी पुन्हा एकदा जगासमोर ठेवला.

पहाटेची थंडी, गार वारे तरीही कोणाच्याही चेहऱ्यावर तक्रारीचा सुर नव्हता. विद्यार्थी, शिक्षक, प्राध्यापक तसेच लहान मुलांपासून ते ज्येष्ठ नागरिकांपर्यंत सर्व जण परिसर स्वच्छ करण्यासाठी उत्साहाने पुढे सरसावले. वृक्षारोपणादरम्यान लावण्यात आलेल्या प्रत्येक रोपाचे ‘दोन ‘वर्षांचे’ पालकत्व’ स्वतः स्वीकारण्याची जबाबदारी वालचंद शिक्षण समूहाने जाहीर केली.

 

उपक्रमात सामील झालेल्या प्रत्येक व्यक्तीच्या चेहऱ्यावर दिसणारी आनंदाची आणि सेवाभावाची ऊर्जा भाऊसाहेब गांधी यांच्या संस्कारांचे मूर्त रूप असल्याची भावना अनेकांनी व्यक्त केली.

 

सोलापूर महानगरपालिका, श्री भाऊसाहेब गांधी प्रतिष्ठान आणि वालचंद शिक्षण समूह यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित या कार्यक्रमाला, सोलापूरकरांनी अप्रतिम व अभूतपूर्व प्रतिसाद दिला. भाऊसाहेबांच्या या जन्मशताब्दी निमित्तऔचित्य साधून केवळ विद्यार्थ्यांनीच नव्हे तर, शिक्षक, कर्मचारी, स्थानिक रहिवासी, विविध क्षेत्रातील मान्यवर, सामाजिक संस्थांचे कार्यकर्ते— सगळ्यांनी एकत्र येऊन शहराच्या ‘स्वच्छतेसाठी’ आणि’ हरित’ सोलापूरसाठी ‘स्तुत्य उपक्रम’ . राबविला.

 

दक्षता उपसंपादक:राजन क्षत्रिय

Related Articles

महाराष्ट्र विद्यालय बार्शीचे एन एम एम एस परीक्षेत घवघवीत यश

*महाराष्ट्र विद्यालय बार्शीचे एन एम एम एस परीक्षेत घवघवीत यश*   मंगळवार दिनांक २४ फेब्रुवारी २०२६ रोजी एन.एम.एम.एस. परीक्षेचा निकाल जाहीर झाला असून, महाराष्ट्र विद्यालय बार्शी...

अक्षय तृतीयेपूर्वी बसवेश्वर महाराजांचा पुतळा बसवण्याचे निर्देश

अक्षय तृतीयेपूर्वी बसवेश्वर महाराजांचा पुतळा बसवण्याचे निर्देश   सोलापूर : महापौर श्री. विनायक कोंड्याल यांनी आज महात्मा बसवेश्वर महाराज पुतळा परिसराची प्रत्यक्ष पाहणी करून सुरू असलेल्या...

spot_img

ताज्या बातम्या

error: Content is protected !!