spot_img
spot_img
spot_img
spot_img

*कु सान्वी गोरे ची राष्ट्रीय बुद्धिबळ स्पर्धेसाठी निवड*

*कु सान्वी गोरे ची राष्ट्रीय बुद्धिबळ स्पर्धेसाठी निवड*

क्रीडा व युवक सेवा संचलनालय महाराष्ट्र राज्य पुणे व जिल्हा क्रीडा परिषद व जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालय सातारा यांच्या वतीने राज्यस्तरावर घेण्यात आलेल्या शालेय बुद्धिबळ स्पर्धेमध्ये महाराष्ट्र विद्यालय बार्शीच्या सान्वी गोरे हीने घवघवीत यश संपादन केले.

कला व वाणिज्य महाविद्यालय सातारा येथे झालेल्या बुद्धिबळ स्पर्धेमध्ये १४ वयोगट मुलींमध्ये राज्यातून तृतीय क्रमांक मिळवत राज्याच्या यादीत येण्याचा मान मिळवला.

या खेळासाठी संघ व्यवस्थापक म्हणून अतुल नलगे यांनी काम पाहिले. सर्व खेळाडूंना क्रीडा शिक्षक पुष्कराज पाटील ,योगेश उपळकर व विकास पाटील यांचे मार्गदर्शन लाभले.

या यशाबद्दल सान्वी गोरे चे संस्थेचे अध्यक्ष डॉ.बी.वाय. यादव ,उपाध्यक्ष एन.एन. जगदाळे,संस्थेचे सचिव पी.टी.पाटील,सहसचिव ए.पी. देबडवार ,संस्थेचे खजिनदार जयकुमार शितोळे, शाळा व्यवस्थापन समितीचे सदस्य डॉ मिराताई यादव व एस.बी. शेळवणे, सर्व कार्यकारिणी सदस्य ,सर्व संस्था सदस्य, विद्यालयाच्या प्राचार्या के.डी.धावणे, उपमुख्याध्यापक आर.बी.सपताळे, पर्यवेक्षिका एन.बी. साठे, सर्व शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी यांनी अभिनंदन करून पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या

 

मुख्य संपादक : दत्ता सुरवसे .

Previous article
Next article

Related Articles

महाराष्ट्र विद्यालय बार्शीचे एन एम एम एस परीक्षेत घवघवीत यश

*महाराष्ट्र विद्यालय बार्शीचे एन एम एम एस परीक्षेत घवघवीत यश*   मंगळवार दिनांक २४ फेब्रुवारी २०२६ रोजी एन.एम.एम.एस. परीक्षेचा निकाल जाहीर झाला असून, महाराष्ट्र विद्यालय बार्शी...

अक्षय तृतीयेपूर्वी बसवेश्वर महाराजांचा पुतळा बसवण्याचे निर्देश

अक्षय तृतीयेपूर्वी बसवेश्वर महाराजांचा पुतळा बसवण्याचे निर्देश   सोलापूर : महापौर श्री. विनायक कोंड्याल यांनी आज महात्मा बसवेश्वर महाराज पुतळा परिसराची प्रत्यक्ष पाहणी करून सुरू असलेल्या...

spot_img

ताज्या बातम्या

error: Content is protected !!