पुण्यातील कोरेगाव पार्क परिसरातील जमीन व्यवहार प्रकरणाबाबत सर्वात मोठी अपडेट समोर आली आहे. संबंधित जमिनीबाबत झालेला व्यवहार रद्द करण्यात आला असल्याची माहिती खुद्द उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी दिली आहे. तसेच या व्यवहारात एकही रुपया दिला गेलेला नाही. एक रुपयाचा व्यवहार झालेला नसताना नोंदणी कशी झाली, पुढील प्रक्रिया कशी झाली हे तपासातून समोर येईल, असंही अजित पवार म्हणाले आहेत.
मुख्य संपादक : दत्ता सुरवसे






