spot_img
spot_img
spot_img
spot_img

✈️ सार्वजनिक सूचना

  • ✈️ सार्वजनिक सूचना

सोलापूर विमानतळ परिसरातील नागरिकांसाठी महत्त्वाचे निर्देश

 

सोलापूर विमानतळ परिसरात राहणाऱ्या सर्व रहिवासी व नागरिकांना पुढील निर्देश देण्यात येत आहेत. या सूचनांचे काटेकोर पालन करावे. उल्लंघन केल्यास संबंधितांवर पोलिसांकडून कठोर कारवाई करण्यात येईल.

 

1️⃣ पतंगबाजीस बंदी :

विमानतळ परिसरात कोणीही पतंग उडवू अथवा पतंगबाजी करू नये.

 

2️⃣ प्रकाश साधनांवर बंदी :

विविध कार्यक्रमांच्या अनुषंगाने लेझर लाईट, शार्पी लाईट, हॅलोजन लाईट किंवा हवेतील तेजस्वी प्रकाश फेकणारी कोणतीही साधने वापरण्यास सक्त मनाई आहे. असे आढळल्यास कारवाई केली जाईल.

 

3️⃣ संरक्षक भिंतीतून प्रवेशास मनाई :

विमानतळाच्या सुरक्षा भिंतीतून कोणतीही व्यक्ती आत प्रवेश करणार नाही. असे केल्यास पोलिसांकडून तात्काळ कारवाई होईल.

 

4️⃣ मटण विक्रेत्यांनी दक्ष राहावे :

विमानतळ भिंतीलगत मांसविक्री दुकानातील वेस्टेज / अवशेष फेकणे कडक बंदी आहे. असे आढळल्यास संबंधित दुकानाचा परवाना कायमस्वरूपी रद्द करण्यात येईल.

 

5️⃣ उंच ठिकाणी झेंडे / पताका लावण्यास बंदी :

विमानतळ परिसरातील घरांवर किंवा उंच ठिकाणी कोणत्याही प्रकारचे झेंडे, पताका इ. लावू नयेत. या प्रकारांमुळे विमानसेवेस अडथळे निर्माण होत आहेत. नियमभंग करणाऱ्यांवर कठोर कारवाई केली जाईल.

 

सर्व नागरिकांनी या सूचनांचे पालन करून प्रशासनास सहकार्य करावे.

 

वरिष्ठ पोलीस निरीक्षक

एमआयडीसी पोलीस ठाणे, सोलापूर

 

 

Related Articles

महाराष्ट्र विद्यालय बार्शीचे एन एम एम एस परीक्षेत घवघवीत यश

*महाराष्ट्र विद्यालय बार्शीचे एन एम एम एस परीक्षेत घवघवीत यश*   मंगळवार दिनांक २४ फेब्रुवारी २०२६ रोजी एन.एम.एम.एस. परीक्षेचा निकाल जाहीर झाला असून, महाराष्ट्र विद्यालय बार्शी...

अक्षय तृतीयेपूर्वी बसवेश्वर महाराजांचा पुतळा बसवण्याचे निर्देश

अक्षय तृतीयेपूर्वी बसवेश्वर महाराजांचा पुतळा बसवण्याचे निर्देश   सोलापूर : महापौर श्री. विनायक कोंड्याल यांनी आज महात्मा बसवेश्वर महाराज पुतळा परिसराची प्रत्यक्ष पाहणी करून सुरू असलेल्या...

spot_img

ताज्या बातम्या

error: Content is protected !!