spot_img
spot_img
spot_img
spot_img

सोलापूर महानगरपालिकेच्या वतीने आपत्ती व्यवस्थापन अंतर्गत नाले रुंदीकरण खोलीकरण व अतिक्रमण निष्कषणाची मोहीम हाती घेण्यात आली होती अंतर्गत झोन क्रमांक 6 मध्ये शेळगी नाल्याचा मूळ प्रवाह कायम करण्याच्या मोहिमेला मोठे यश प्राप्त झाले आहे.

सोलापूर महानगरपालिकेच्या वतीने आपत्ती व्यवस्थापन अंतर्गत नाले रुंदीकरण खोलीकरण व अतिक्रमण निष्कषणाची मोहीम हाती घेण्यात आली होती अंतर्गत झोन क्रमांक 6 मध्ये शेळगी नाल्याचा मूळ प्रवाह कायम करण्याच्या मोहिमेला मोठे यश प्राप्त झाले आहे.

 

सदर नाल्याच्या प्रवाहाचा 1912 मधील मोजणी नकाशा महानगरपालिकेकडे प्राप्त झाला आहे. या नकाशानुसार नाल्याचा मूळ प्रवाह आणि त्याची दिशा निश्चित झाल्याने महानगरपालिकेचे कार्यवाहीला बळकटी मिळाली आहे.

 

महानगरपालिकेच्या अभियांत्रिकी विभागामार्फत संबंधित विभागीय अधिकारी व अभियंते नियमित स्थळ पाहणी करून कामाचा वेग व गुणवत्ता यावर लक्ष ठेवत आहेत. या कामामुळे परिसरातील पाणी साचणे, दुर्गंधी, तसेच पावसाळ्यातील जलनिस्सारणाच्या तक्रारी यावर प्रभावी नियंत्रण येणार आहे.

 

महानगरपालिकेचे आयुक्त डॉ. सचिन ओम्बासे यांनी सांगितले की, “शहरातील सर्व नाले आणि जलवाहिन्यांचा प्रवाह नैसर्गिक दिशेने रहावा व त्यात कोणतेही अडथळे राहू नयेत यासाठी महानगरपालिकेच्या पातळीवर सातत्याने काम सुरू आहे. नागरिकांनीही अशा कामात सहकार्य करून परिसर स्वच्छ व प्रदूषणमुक्त ठेवण्यास मदत करावी.”

 

सदर नाल्याचे काम पूर्ण झाल्यानंतर संबंधित परिसरातील नागरिकांना घरात पाऊस चे पाणी तुंबणार नाही यापासून दिलासा मिळणार असून जलप्रवाह व्यवस्थापन अधिक सक्षम होईल

 

दक्षता उपसंपादक:राजन क्षत्रिय

Related Articles

महाराष्ट्र विद्यालय बार्शीचे एन एम एम एस परीक्षेत घवघवीत यश

*महाराष्ट्र विद्यालय बार्शीचे एन एम एम एस परीक्षेत घवघवीत यश*   मंगळवार दिनांक २४ फेब्रुवारी २०२६ रोजी एन.एम.एम.एस. परीक्षेचा निकाल जाहीर झाला असून, महाराष्ट्र विद्यालय बार्शी...

अक्षय तृतीयेपूर्वी बसवेश्वर महाराजांचा पुतळा बसवण्याचे निर्देश

अक्षय तृतीयेपूर्वी बसवेश्वर महाराजांचा पुतळा बसवण्याचे निर्देश   सोलापूर : महापौर श्री. विनायक कोंड्याल यांनी आज महात्मा बसवेश्वर महाराज पुतळा परिसराची प्रत्यक्ष पाहणी करून सुरू असलेल्या...

spot_img

ताज्या बातम्या

error: Content is protected !!