spot_img
spot_img
spot_img
spot_img

आयुक्त डॉ. सचिन ओम्बासे यांची एडवेंचर पार्क,स्ट्रीट बाजार व रंगभवन प्लाझा येथे केली पाहणी

आयुक्त डॉ. सचिन ओम्बासे यांची एडवेंचर पार्क,स्ट्रीट बाजार व रंगभवन प्लाझा येथे केली पाहणी

 

सोलापूर महानगरपालिकेचे आयुक्त डॉ. सचिन ओम्बासे यांनी स्मार्ट सिटी अंतर्गत विकसित एडवेंचर पार्क,स्ट्रीट बाजार तसेच रंगभवन प्लाझा येथे भेट देऊन पाहणी केली. यावेळी उपायुक्त आशिष लोकरे, कार्यकारी अभियंता (विद्युत) राजेश परदेशी, सहाय्यक अभियंता (विद्युत) महादेव इंगळे, कनिष्ठ अभियंता सतीश बोरला, स्वप्नील पवार, उद्यान अधीक्षक स्वप्नील सोलंकर, स्वामीनाथ कल्याणशेट्टी यांच्यासह संबंधित अधिकारी व कर्मचारी उपस्थित होते.

 

आयुक्तांनी एडवेंचर पार्क परिसरात श्री सिद्धेश्वर मंदिर तलाव शेजारील लेक फ्रंटवरील वॉकिंग ट्रॅकवरील गवत काढणे, वाढलेल्या झाडांच्या फांद्या छाटणे आणि झाडांची देखभाल करण्याच्या सूचना दिल्या. तसेच एडवेंचर पार्क भिंतीलगत असलेल्या झाडांचे बुंधा व आजोरे न उचलल्याबद्दल संबंधित आरोग्य निरीक्षकावर ५०० रुपयांचा दंड आकारण्याच्या सूचना दिल्या. पार्कबाहेरील किरकोळ दुरुस्ती तसेच तलाव परिसरातील वाढलेली झाडे तत्काळ छाटण्याचे निर्देश दिले. तसेच पार्कमधील ई-टॉयलेट त्वरित दुरुस्त करून सुरु करण्याचे आदेश दिले.

 

रंगभवन प्लाझा येथील एलईडी दुरुस्तीचे काम एका आठवड्यात पूर्ण करण्याच्या सूचना मक्तेदारांना देण्यात आल्या. तसेच प्लाझा परिसरातील ओपन गटारातील माती काढून स्वच्छता करण्याचे निर्देश आयुक्तांनी दिले.

 

स्ट्रीट बाजाराची लिलाव प्रक्रिया तात्काळ राबविण्याच्या तसेच वीर सावरकर मैदानातील जागा खाद्यपदार्थ विक्री व पार्किंगसाठी भाड्याने देण्यासाठी लिलाव प्रक्रिया करण्याच्या सूचना देण्यात आल्या.

 

आयुक्त डॉ. ओम्बासे यांनी पाहणीदरम्यान सर्व विभागांनी एकत्रित समन्वय साधून स्मार्ट सिटी अंतर्गत विकसित केलेल्या सुविधांची नियमित देखभाल, स्वच्छता व व्यवस्थापन उत्तम राखावे, असे निर्देश दिले.

दक्षता उपसंपादक:राजन क्षत्रिय

Related Articles

महाराष्ट्र विद्यालय बार्शीचे एन एम एम एस परीक्षेत घवघवीत यश

*महाराष्ट्र विद्यालय बार्शीचे एन एम एम एस परीक्षेत घवघवीत यश*   मंगळवार दिनांक २४ फेब्रुवारी २०२६ रोजी एन.एम.एम.एस. परीक्षेचा निकाल जाहीर झाला असून, महाराष्ट्र विद्यालय बार्शी...

अक्षय तृतीयेपूर्वी बसवेश्वर महाराजांचा पुतळा बसवण्याचे निर्देश

अक्षय तृतीयेपूर्वी बसवेश्वर महाराजांचा पुतळा बसवण्याचे निर्देश   सोलापूर : महापौर श्री. विनायक कोंड्याल यांनी आज महात्मा बसवेश्वर महाराज पुतळा परिसराची प्रत्यक्ष पाहणी करून सुरू असलेल्या...

spot_img

ताज्या बातम्या

error: Content is protected !!