spot_img
spot_img
spot_img
spot_img

केंद्रीय पथकाकडून उत्तर व दक्षिण सोलापूर तालुक्यांतील अतिवृष्टीग्रस्त भागांची पाहणी

केंद्रीय पथकाकडून उत्तर व दक्षिण सोलापूर तालुक्यांतील अतिवृष्टीग्रस्त भागांची पाहणी

 

सोलापूर, दि. ५ : अतिवृष्टी आणि पुराच्या पार्श्वभूमीवर जिल्ह्यातील शेती, पायाभूत सुविधा आणि सार्वजनिक मालमत्तेच्या झालेल्या नुकसानीचा आढावा घेण्यासाठी केंद्रीय पथकाने आज सोलापूर जिल्ह्याचा दौरा केला.

 

या पथकात केंद्रीय ग्रामविकास विभागाचे अवर सचिव अभिषेक कुमार, ऊर्जा विभागाचे उपसंचालक करन सरीन, वित्त विभागाचे उपसचिव कंदर्फ पटेल, तसेच जलशक्ती विभागाचे संचालक सत्येंद्र प्रताप सिंग यांचा समावेश होता.

 

पथकाने वडकबाळ आणि हत्तुर (द. सोलापूर) तसेच तिऱ्हे आणि शिवणी (उ. सोलापूर) या गावांना भेट देऊन विविध ठिकाणी झालेल्या नुकसानीची पाहणी केली.

• वडकबाळ येथे बंधाऱ्याची स्थिती, शेतीतील नुकसान आणि वीज वितरण कंपनीच्या सबस्टेशनवरील हानीचा आढावा घेण्यात आला.

• हत्तुर येथे रस्त्यांची अवस्था, शेतीतील नुकसान आणि जिल्हा परिषद शाळेवरील झालेल्या परिणामाची पाहणी झाली.

• तिऱ्हे येथे समशानभूमी व शेतीवरील नुकसान तपासण्यात आले.

• शिवणी येथे घरांची पडझड आणि जिल्हा परिषद शाळेच्या इमारतीवरील नुकसान पाहण्यात आले.

 

पथकातील अधिकाऱ्यांनी नुकसानग्रस्त शेतकऱ्यांशी संवाद साधून शेती, पिके, तसेच सिंचन विहिरींच्या स्थितीबाबत सविस्तर माहिती जाणून घेतली.

 

जिल्हाधिकारी कुमार आशीर्वाद यांनी वडकबाळ, हत्तुर, तिऱ्हे आणि शिवणी येथे झालेल्या शेती, रस्ते, वीज वितरण, शाळा आणि समशानभूमीच्या नुकसानीचा सविस्तर अहवाल पथकास सादर केला.

 

या पाहणी दौऱ्यात जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी कुलदीप जंगम, जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी शुक्राचार्य भोसले, प्रांताधिकारी सदाशिव पडदुने व सुमित शिंदे, उत्तर सोलापूर तहसीलदार निलेश पाटील, दक्षिण सोलापूर तहसीलदार किरण जमदाडे, तसेच सार्वजनिक बांधकाम विभाग, वीज वितरण कंपनी आणि इतर संबंधित विभागांचे अधिकारी उपस्थित होते.

 

दक्षता उपसंपादक:राजन क्षत्रिय

Related Articles

महाराष्ट्र विद्यालय बार्शीचे एन एम एम एस परीक्षेत घवघवीत यश

*महाराष्ट्र विद्यालय बार्शीचे एन एम एम एस परीक्षेत घवघवीत यश*   मंगळवार दिनांक २४ फेब्रुवारी २०२६ रोजी एन.एम.एम.एस. परीक्षेचा निकाल जाहीर झाला असून, महाराष्ट्र विद्यालय बार्शी...

अक्षय तृतीयेपूर्वी बसवेश्वर महाराजांचा पुतळा बसवण्याचे निर्देश

अक्षय तृतीयेपूर्वी बसवेश्वर महाराजांचा पुतळा बसवण्याचे निर्देश   सोलापूर : महापौर श्री. विनायक कोंड्याल यांनी आज महात्मा बसवेश्वर महाराज पुतळा परिसराची प्रत्यक्ष पाहणी करून सुरू असलेल्या...

spot_img

ताज्या बातम्या

error: Content is protected !!