spot_img
spot_img
spot_img
spot_img

सोलापुरात 3 ते 5 नोव्हेंबर रोजी गझल महोत्सव होणार सांस्कृतिक कार्य संचालनालयाकडून आयोजन

सोलापुरात 3 ते 5 नोव्हेंबर रोजी गझल महोत्सव होणार सांस्कृतिक कार्य संचालनालयाकडून आयोजन

 

सोलापूर : महाराष्ट्र राज्य सांस्कृतिक कार्य संचालनालय यांच्याकडून दि. 3,4 आणि 5 नोव्हेंबर या तीन दिवशीय हुतात्मा स्मृती मंदिर मध्ये सायंकाळी 6.30 वाजता गझल महोत्सवाचे आयोजन करण्यात आल्याची माहिती समन्वयक अमोल धाबळे यांनी दिली.

महाराष्ट्र राज्याचे सांस्कृतिक कार्यमंत्री ॲड.आशिष शेलार यांच्या संकल्पनेतून तसेच सांस्कृतिक कार्य विभागाचे सचिव डॉ. किरण कुलकर्णी यांच्या मार्गदर्शनाखाली आणि सांस्कृतिक कार्य संचालक बिभीषण चवरे यांच्या प्रयत्नाने गझल महोत्सव ३,४,५ नोव्हेंबर रोजी आयोजित केलेला आहे.

या गझल महोत्सवा मध्ये कवन प्रस्तुत “अक्षर अक्षर तुझेच आहे” (गझल विशेष मैफल), गझलनवाज भीमराव पांचाळ यांचे शब्द सुरांची भावयात्रा, तसेच वैभव जोशी आणि दत्तप्रसाद रानडे यांचा “सोबतीचा करार” (गझल मैफल) या कार्यक्रमांचे आयोजन केलेले आहे.

०३-११-२०२५

कवन प्रस्तुत…..

अक्षर अक्षर तुझेच आहे

(गझल विशेष मैफल),

कलाकार:- अपूर्व राजपूत,

अविनाश काठवटे, सारंग पांपटवार, नैनेश तांबे

संगीत संयोजन: – राग

प्रकाशयोजना:- ईशान- गार्गी

याच दिवशी मध्यंतरानंतर

गझल रंग (मुंबई)

वीनल देशमुख, तृप्ती दामले, उमेश साळुंके,

०४- ११- २०२५

शब्द सुरांची भावयात्रा

(गझल मैफल)

गझलनवाज पं.भीमराव पांचाळे .. गायन

डॉ. भाग्यश्री पांचाळे .. गायन

साथसंगत :

गिरीश पाठक .. तबला

ओंकार सोनवणे .. हार्मोनियम

अब्रार अहमद .. संतूर

प्रशांत अग्निहोत्री .. बासरी

किशोर बळी .. निवेदन

०५- ११.२०२५

सोबतीचा करार

कवी:- वैभव जोशी

गायक:- दत्तप्रसाद रानडे

संगीत दिग्दर्शक:- आशिष मुजुमदार

निनाद सोलापूरकर:- हार्मोनियम

मिलिंद शेवारे:- गिटार

समीर शिवगार:- तबला

अमोद कुलकर्णी:- ढोलक

गझल महोत्सवातील हे तीनही कार्यक्रम हुतात्मा स्मृती मंदिर येथे सायंकाळी ६:३० वा. आयोजित होणार आहेत. या कार्यक्रमाला मोफत प्रवेश असला तरी प्रवेशिका घेणे अनिवार्य आहे. या प्रवेशिका हुतात्मा स्मृती मंदिर येथील बुकिंग ऑफिसमध्ये उपलब्ध आहेत.

या तीन दिवसीय गझल महोत्सवाला सोलापूरकर रसिकांनी भरभरून प्रतिसाद द्यावा असे आवाहन सांस्कृतिक कार्य संचालक बिभीषण चवरे यांनी केले आहे.

दक्षता उपसंपादक:राजन क्षत्रिय

Related Articles

महाराष्ट्र विद्यालय बार्शीचे एन एम एम एस परीक्षेत घवघवीत यश

*महाराष्ट्र विद्यालय बार्शीचे एन एम एम एस परीक्षेत घवघवीत यश*   मंगळवार दिनांक २४ फेब्रुवारी २०२६ रोजी एन.एम.एम.एस. परीक्षेचा निकाल जाहीर झाला असून, महाराष्ट्र विद्यालय बार्शी...

अक्षय तृतीयेपूर्वी बसवेश्वर महाराजांचा पुतळा बसवण्याचे निर्देश

अक्षय तृतीयेपूर्वी बसवेश्वर महाराजांचा पुतळा बसवण्याचे निर्देश   सोलापूर : महापौर श्री. विनायक कोंड्याल यांनी आज महात्मा बसवेश्वर महाराज पुतळा परिसराची प्रत्यक्ष पाहणी करून सुरू असलेल्या...

spot_img

ताज्या बातम्या

error: Content is protected !!