प्रिसीजन कॅमशाफ्ट चे MD व माझे व अक्षया चे बिजनेसमधील मेंटर Yatin Shah सरांना वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा…!
गेल्या 6 वर्षांपासून सरांचे मार्गदर्शन सतत पाठीशी आहे.
वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा सर…
– आनंद & अक्षया
*ग्रामपंचायतीच्या मासिक सभांमध्ये ग्रामस्थांना देखील उपस्थित राहण्याचा अधिकार …….*
“`महाराष्ट्र राज्यातील ग्रामपंचायतीची मासिक सभा सर्व ग्रामस्थांसाठी खुली असल्याचे महाराष्ट्र गामपंचायत अधिनियम १९५९ मधील मुंबई ग्रामपंचायत (सभांबावत) नियम १९५९ [क्र. १७६ (२), खंड (७)] मधील नियम १ टीप १ मध्ये नमूद केलेले आहे. तसेच ग्रामपंचायतच्या मासिक सभेच्या बैठकीसाठी जास्तीत जास्त लोक हजर राहण्यासाठी मोठ्या प्रमाणात पसिद्धी द्यावी व योग्य ती उपाययोजना आखण्यात यावी अशी देखील स्पष्ट तरतूद ग्रामविकास विभागाचे शासन परिपत्रक क. ‘पीआरसी १०७७/२७०३/सीआर (२७३२); दि.११/०९/१९७८’ मध्ये केलेली आहे. परंतू, सदर दोन्हीही शासन नियमावलीं संदर्भात राज्य शासनाच्या ग्रामविकास विभागाकडून अथवा वरिष्ठ कार्यालय/अधिका-यांकडून कोणत्याही स्वतंत्र सूचना अथवा घेट आदेश प्राप्त नसल्याचे कारण सांगून ग्रामपंचायतीची मासिक सभा सर्व ग्रामस्थांसाठी खुली करणेस राज्यातील अनेक ग्रामपंचायती ग्रामस्थांना नकार/मज्जाव / अटकाव करीत असल्याचे दिसून येते. वास्तविक कोणताही शासन कायदा व त्या कायद्यातील नियम, शासन निर्णय तसेच शासन परिपत्रके राज्य शासनाकडून पारित झाल्यानंतर राज्य शासनाचा कोणताही विभाग अथवा त्या विभागाच्या अधिनस्त असलेल्या कार्यालयांकडून अथवा संबंधित वरिष्ठ अधिका-यांकडून त्याबाबत कोणत्याही स्वतंत्र सूचना अथवा आदेश काढण्याची कोणतीही आवश्यकता नसते. परंतू प्रशासकीय कामकाजाचे अज्ञान असल्यामुळे अथवा ग्रामपंचायतींची मासिक सभा सर्व गामस्थांसाठी खुली करणेची इच्छा नसल्यामुळे राज्यातील अनेक जिल्हा परिषद व पंचायत समितीतील वरिष्ठ अधिकारी देखील सदर शासन नियमावलीं कडे दूर्लक्ष करतात व ग्रामपंचायतीची मासिक सभा सर्व ग्रामस्थांसाठी खुली करावी किंवा कसे याबाबतच्या निर्णयाबाबत राज्य शासनाकडे बोट दाखवित असल्याचे दिसून येते. सदर बाब महाराष्ट्रासारख्या प्रशासकीयदृष्ट्या प्रगल्भअसलेल्या राज्याला निश्चितच लाजिरवाणी आहे. तरी आपल्या ग्रामपंचायतीच्या संदर्भात आपले गांव कारभारी गावाचा कारभार हाकण्यासाठी कसे निर्णय करतात, हे थेट व प्रत्यक्ष जाणून घेणेकरिता सर्वच गामस्थांनी सदर नियमावलीं नुसार आपल्या ग्रामपंचायतीच्या मासिक सभांमध्ये उपस्थित राहावे असे जाहीर आवाहन“` *दिपक पाचपुते जिल्हाध्यक्ष ज्ञानमाता सेवाभावी संस्था ®️ (NGO) संचलित माहिती अधिकार नागरिक समूह, अहिल्या नगर, महाराष्ट्र राज्य* “`यांनी एका प्रसिद्धी पत्रकाद्वारे केलेले आहे.“`
*Like करा, follow करा, Comment करा, Share करा!*
दक्षता उपसंपादक:राजन क्षत्रिय






