spot_img
spot_img
spot_img
spot_img

सोलापूर : श्री राजराजेश्वर सहस्त्रार्जुन भगवान यांचा जन्मोत्सवात अभिषेक करताना समाजातील मान्यवर. (दुसऱ्या छायाचित्रात) जन्मोत्सव सोहळ्यात सहभागी समाजबांधव व भगिनी.

 

जय सहस्त्रार्जुन ! भक्तिमय वातावरणात जन्मोत्सव सोहळा

 

सायंकाळी लेझीम पथकाने वाढवली मिरवणुकीची शोभा

 

सोलापूर, ता. २९ : श्री सोमवंशीय सहस्त्रार्जुन क्षत्रिय समाजाचे आराध्य दैवत श्री राजराजेश्वर सहस्त्रार्जुन भगवान यांचा जन्मोत्सव सोलापुरात बुधवारी मोठ्या भक्तिभावात आणि उत्साहाच्या वातावरणात पार पडला. क्षत्रिय गल्ली येथे सकाळी पार पडलेल्या भगवानांच्या जन्मोत्सव सोहळ्यात क्षत्रिय समाजबांधवांनी व भगिनींनी आराध्यांचा जन्मोत्सव साजरा केला.

 

सकाळी ८ वाजता क्षत्रिय गल्लीतील

 

श्री विठ्ठल मंदिरात मंगलमय वातावरणात जन्मोत्सवाच्या कार्यक्रमाची सुरव सुरवात झाली. ट्रस्टी अध्यक्ष संजीव बिद्री, शक्तीपूजा मंडळाचे अध्यक्ष श्याम मेंगजी, प्रतिष्ठानचे अध्यक्ष अक्षय बिद्री, आणि नरेश पुणेकर यांनी सपत्नीक श्री राजराजेश्वर सहस्त्रार्जुन भगवान यांची मंत्रोच्चारात विधिवत पूजा केली. यावेळी मोठ्या संख्येने समाजबांधवांची

 

उपस्थिती होती. या जन्मोत्सवाच्या निमित्ताने संपूर्ण सोलापूर शहरात धार्मिक व उत्साहाचे वातावरण निर्माण झाले.

 

शोभायात्रेत लेझीमचे डाव

 

५ वाजता सायंकाळी जन्मोत्सवानिमित्त भव्य मिरवणुकीचे (शोभायात्रेचे) आयोजन करण्यात आले होते. हुतात्मा चौकातून मिरवणुकीस प्रारंभ झाला. २०० सदस्यांच्या लेझीम

 

६६

 

गेल्या ५ दिवसांपासून भगवानांच्या जन्मोत्सव सोहळ्यानिमित्त क्षत्रिय गल्लीत धार्मिक कार्यक्रमांचे आयोजन केले होते. यासोबतच समाजातील गुणवंत विद्यार्थ्यांना सायकल व त्यांचा सत्कार, होम मिनिस्टर यांसारखे उपक्रम राबवत यंदाचा जन्मोत्सव भक्तिभावे पार पडला.

 

– अक्षय बिद्री, उत्सव अध्यक्ष, सोलापूर

 

ताफ्याने मिरवणूक मार्गावर सुरेख डाव सादर करत लोकांची मने जिंकली. सुभाष चौक, दत्त चौक, सोन्या मारुती,

 

मंगला मारुती, मंगळवार पेठ पोलिस चौकी, कुंभार वेस मार्गे क्षत्रिय गल्ली येथे मिरवणुकीची सांगता झाली.

दक्षता उपसंपादक:राजन क्षत्रिय

Related Articles

महाराष्ट्र विद्यालय बार्शीचे एन एम एम एस परीक्षेत घवघवीत यश

*महाराष्ट्र विद्यालय बार्शीचे एन एम एम एस परीक्षेत घवघवीत यश*   मंगळवार दिनांक २४ फेब्रुवारी २०२६ रोजी एन.एम.एम.एस. परीक्षेचा निकाल जाहीर झाला असून, महाराष्ट्र विद्यालय बार्शी...

अक्षय तृतीयेपूर्वी बसवेश्वर महाराजांचा पुतळा बसवण्याचे निर्देश

अक्षय तृतीयेपूर्वी बसवेश्वर महाराजांचा पुतळा बसवण्याचे निर्देश   सोलापूर : महापौर श्री. विनायक कोंड्याल यांनी आज महात्मा बसवेश्वर महाराज पुतळा परिसराची प्रत्यक्ष पाहणी करून सुरू असलेल्या...

spot_img

ताज्या बातम्या

error: Content is protected !!