spot_img
spot_img
spot_img
spot_img

श्री विठ्ठल साखर कारखान्याच्या गळीत हंगामास सुरुवात — “प्रत्येक शेतकऱ्याचा उस गाळप होईपर्यंत कारखाना सुरूच राहील”

श्री विठ्ठल साखर कारखान्याच्या गळीत हंगामास सुरुवात — “प्रत्येक शेतकऱ्याचा उस गाळप होईपर्यंत कारखाना सुरूच राहील”

 

पंढरपूर (दि. २९ ऑक्टोबर २०२५):

श्री विठ्ठल सहकारी साखर कारखान्याचा २०२५-२६ चा गळीत हंगाम मोळी पूजनाने विधिवत सुरू झाला.

 

या पूजनाचा कार्यक्रम ह.भ.प. जगन्नाथ महाराज देशमुख यांच्या हस्ते पार पडला, तर कारखान्याचे काटापूजन संचालक अशोक तोंडले व संचालक सचिन पाटील या दाम्पत्यांच्या हस्ते करण्यात आले.

 

या वर्षी पावसाळा समाधानकारक झाल्यामुळे कारखान्याकडे गाळपासाठी मुबलक ऊस उपलब्ध झाला आहे. संचालक मंडळ व अधिकाऱ्यांनी “यंदा उच्चांकी गाळपाचे उद्दिष्ट साध्य करण्यासाठी योग्य नियोजन करण्यात आले आहे”, असे सांगितले.

 

यावेळी उपस्थित सर्व संचालक व मान्यवरांनी सांगितले की,

 

“सभासद शेतकऱ्यांचा शेवटचा ऊस गाळप केल्याशिवाय कारखाना बंद होणार नाही.”

 

समारोपात संचालक मंडळ, अधिकारी व कर्मचाऱ्यांना यशस्वी हंगामासाठी शुभेच्छा देण्यात आल्या.

दक्षता उपसंपादक : राजन क्षत्रिय

Related Articles

महाराष्ट्र विद्यालय बार्शीचे एन एम एम एस परीक्षेत घवघवीत यश

*महाराष्ट्र विद्यालय बार्शीचे एन एम एम एस परीक्षेत घवघवीत यश*   मंगळवार दिनांक २४ फेब्रुवारी २०२६ रोजी एन.एम.एम.एस. परीक्षेचा निकाल जाहीर झाला असून, महाराष्ट्र विद्यालय बार्शी...

अक्षय तृतीयेपूर्वी बसवेश्वर महाराजांचा पुतळा बसवण्याचे निर्देश

अक्षय तृतीयेपूर्वी बसवेश्वर महाराजांचा पुतळा बसवण्याचे निर्देश   सोलापूर : महापौर श्री. विनायक कोंड्याल यांनी आज महात्मा बसवेश्वर महाराज पुतळा परिसराची प्रत्यक्ष पाहणी करून सुरू असलेल्या...

spot_img

ताज्या बातम्या

error: Content is protected !!