*दत्तात्रय सूर्यवंशी सर म्हणजे शैक्षणिक,सामाजिक सेवेचे वारकरी……सरजी,तुम जियो हजारो साल…..!* जयसिंगपूर येथील श्री.दत्तात्रय सूर्यवंशी सर हे दि.31 मे 2024 रोजी मुख्याध्यापक पदावरून सेवानिवृत्त झाले आहेत.सरांच्या एकूण पस्तीस वर्षे प्रामाणिक शैक्षणिक सेवा केली आहे.त्यांच्या सन्मानपूर्वक सेवा वाटचालीला सलाम.पंधरा वर्षे मुख्याध्यापक म्हणून कार्यरत असलेले सूर्यवंशी सरांनी *उपक्रमशील मुख्याध्यापक* म्हणून आपली सेवा पूर्ण केली आहे.सरांनी ज्या ज्या शाळेत सेवा केली त्या सर्व शाळा उच्च सर्वोत्तम बनवल्या. सेवाव्रत हे ध्येय ठेवून काम केले.अनेक उत्कृष्ट विद्यार्थी घडवले सर्व शाळा *आदर्श शाळा* म्हणून नावारूपाला आणल्या.या सेवेबद्दल श्री.सूर्यवंशी सरांना जिल्हा परिषदेचा *उपक्रमशील आदर्श मुख्याध्यापक पुरस्कार* प्राप्त आहे.सरांना आजपर्यंत विविध पुरस्कार प्राप्त आहेत.शैक्षणिक सेवेसोबत सरांचे बुरुड समाजातही कार्य आहे.सरांनी सातत्याने समाजाचे वैचारिक मंथन घडवून आणले ,या वाटचालीत त्यांना पत्नी आदर्श शिक्षिका सौ.सुनीता मॅडम यांची मोलाची साथ लाभली आहे.सरांच्या वाढदिवसाबद्दल खूप खूप हार्दिक शुभेच्छा. शुभेच्छुक: *दशरथ वडतिले*, सोलापूर ९४२२४५७१००
उपसंपादक : राजन क्षत्रिय






