spot_img
spot_img
spot_img
spot_img

सोलापूर : भारतीय जनता पार्टी, सोलापूर शहर जिल्हा यांच्या सहकार सेल (प्रकोष्ठ) ची नवीन कार्यकारिणी जाहीर करण्यात आली असून आज . भारतीय जनता पार्टी सहकार सेलचे संयोजक श्रीं गणेश चौटे यांच्या वतीने व महापौर श्री विनायक कोंड्याल यांच्या हस्ते तर शहर अध्यक्षा रोहिणी तडवळकर, उपमहापौर ज्ञानेश्वरी देवकर, सभागृह नेते नरेंद्र काळे, स्थायी समिती सभापती रंजीता चाकोते यांच्या प्रमुख उपस्थितीत सह संयोजक म्हणून किशोर नारायणराव बसूदे व प्रशांत रामकृष्ण हबीब यांना नियुक्ती पत्र देण्यात आले.तसेच सदस्य म्हणून प्रमोद सुनील पवार, कृष्णाथ खंडूसा दलमंजन, राकेश शंकर काशिगाव , अभिषेक श्रीनिवास पवार, सतीश मोतीलाल बिद्री , राहुल मोतीलाल शालगर, बसवराज शिवपुत्र इंडे, शिवानंद पंचय्या पुराणिक, श्रीनिवास मधुकर पेठकर, राजू गिरूसा पवार, चंद्रकांत बुडप्पा मिस्कीन व अर्जुन हणमंसा पवार यांचा समावेश करण्यात आला आहे. या सर्व पदाधिकाऱ्यांना नियुक्तीपत्र देण्यात आले. यावेळी मान्यवरांनी नव्या कार्यकारिणीचे अभिनंदन करत पक्ष संघटना अधिक मजबूत करण्यासाठी तसेच सहकार क्षेत्रात प्रभावी काम करण्याचे आवाहन केले.यावेळी भारतीय जनता पार्टी, सोलापूर शहर जिल्हा यांच्या सहकार सेल (प्रकोष्ठ)च्या वतीने महापौर श्रीं विनायक कोंड्याल सत्कार करण्यात आले.

 

दक्षता उपसंपादक:राजन क्षत्रिय

Related Articles

spot_img

ताज्या बातम्या

error: Content is protected !!