spot_img
spot_img
spot_img
spot_img

आज आकाशवाणी सोलापूर केंद्राचा ४० वा वर्धापन दिन आहे. यानिमित्त आज आकाशवाणी सोलापूर केंद्र येथे जाऊन केंद्र निदेशिका अर्चिता ढेरे मॅडम आणि कार्यक्रम विभागप्रमुख डॉ श्री सोमेश्वर पाटील सर यांची भेट घेऊन शुभेच्छा दिल्या. याप्रसंगी माझ्या सोबत माजी नगरसेवक गुरुशांत धुत्तरगांवकर, सिध्दाराम खजुरगी उपस्थित होते. आकाशवाणी सोलापूर केंद्रातील नैमित्तिक निवेदक, तांत्रिक विभागातील अधिकारी व कर्मचारी यांची भेट झाली.

 

गेल्या 40 वर्षापासून, माहिती शिक्षण आणि मनोरंजन यांचा मेळ घालून लोकाभिमुख कार्यक्रमाची परंपरा आकाशवाणीने जपली आहे. 

माध्यमांच्या गराडयात सुद्धा आकाशवाणीने एक विश्वासार्ह माध्यम म्हणून स्वतःची प्रतिमा आजही जपलेली आहे.

 विशेषतः 

 जिथं कोणतंही वर्तमानपत्र पोहोचत नाही अशा दुर्गम भागातील वाड्या-वस्त्यांपर्यंत सोलापूर आकाशवाणीचं प्रसारण पोहोचतं.   

 

 ग्रामीण भागामध्ये तर अनेक लोकांची सकाळची सुरुवातच रेडीओने होते.

 

 शासनाच्या अनेक लोकोपयोगी कल्याणकारी योजना असोत किंवा शासनाला इतर कोणतीही माहिती लोकांपर्यंत जर पोहचवायची असेल तर आकाशवाणी हे एक प्रभावी माध्यम आहे.

 

 देशाचे पंतप्रधान माननीय नरेंद्रजी मोदी हे देखील मन की बात या कार्यक्रमातून देशातील लोकांशी आकाशवाणी वरूनच संवाद साधतात.

 

सोलापुरातील आजूबाजूला घडणाऱ्या सर्व घडामोडींचं प्रतिबिंब असणारा “सोलापूर दिनांक” या कार्यक्रमातून वर्तमानपत्र हातात येण्याआधी सोलापूर जिल्ह्यातल्या सर्व घडामोडी कळतात.

 

 लोकसेवा प्रसारक म्हणून आकाशवाणीने नैसर्गिक आपदा असो किंवा युद्धजन्य परिस्थिती असो वा कोरोना सारखी महामारी असो या कठीण परिस्थितीमध्ये देखील आकाशवाणीने आपल्या सेवेमध्ये कुठेही खंड पडू दिला नाही. आज 40 वर्षानंतरही तितकीच प्रभावीपणे सुरू आहे.

 

आकाशवाणी सोलापूर केंद्राला वर्धापन दिनाच्या खूप खूप शुभेच्छा !

 

– विनायक रामकृष्ण कोंड्याल

महापौर, सोलापूर महानगरपालिका, सोलापूर

 

दक्षता उपसंपादक:राजन क्षत्रिय

Related Articles

कोल्हापूर डीआयजी रंजन कुमार शर्मा यांचा सत्कार करताना

कोल्हापूर डीआयजी रंजन कुमार शर्मा यांचा सत्कार करताना सार्वजनिक गणेशोत्सव बैठकीचे आयोजन करण्यासाठी आलेले प्रमुख पाहुणे म्हणून त्यांचा मानसन्मान केला व तसेच एसपी साहेब...

आमचे स्वाभिमान, सोलापूरचे विकासरत्न,दमदार,आमदार मा.श्री.देवेंद्र दादा कोठे तसेच लोकप्रिय नगरसेवक मा.श्री.प्रथमेश दादा कोठे या दोन्ही दादासाहेबाना वाढदिवसाच्या मनःपूर्वक हार्दिक हार्दिक शुभेच्छा..

आमचे स्वाभिमान, सोलापूरचे विकासरत्न,दमदार,आमदार मा.श्री.देवेंद्र दादा कोठे तसेच लोकप्रिय नगरसेवक मा.श्री.प्रथमेश दादा कोठे या दोन्ही दादासाहेबाना वाढदिवसाच्या मनःपूर्वक हार्दिक हार्दिक शुभेच्छा..   दक्षता उपसंपादक:राजन क्षत्रिय

spot_img

ताज्या बातम्या

error: Content is protected !!