spot_img
spot_img
spot_img
spot_img

मध्य-पूर्वेतील वाढत्या युद्धजन्य परिस्थितीमुळे जागतिक स्तरावर तेल आणि वायू पुरवठ्यावर परिणाम झाला आहे. भारतात निर्माण होऊ शकणारे एलपीजी संकट लक्षात घेता केंद्र सरकारने तातडीने आपला ‘प्लॅन-बी’ कार्यान्वित केला आहे. गॅसचा तुटवडा भासू नये यासाठी ऑस्ट्रेलिया, कॅनडा आणि अल्जीरिया यांसारख्या देशांकडून एलएनजी आणि एलपीजीचा अतिरिक्त साठा भारतात येण्यास सुरुवात झाली आहे. देशांतर्गत पुरवठा सुरळीत ठेवण्यासाठी केंद्र सरकारने महत्त्वाचा निर्णय घेतला आहे. मिळालेल्या माहितीनुसार, IOCL, BPCL आणि HPCL यांसारख्या भारतीय रिफायनरींनी एलपीजीच्या घरगुती उत्पादनात १० टक्क्यांनी वाढ केली आहे. यामुळे सामान्य नागरिकांना स्वयंपाकाच्या गॅससाठी रांगेत उभे राहण्याची किंवा तुटवड्याची भीती बाळगण्याची गरज भासणार नाही.

 

दक्षता उपसंपादक:राजन क्षत्रिय

Related Articles

🔹 वादळी वाऱ्याने उडाले घराचे छप्पर परंडा तालुक्यातील मौजे खासापुरी येथील अत्यंत गरीब कुटुंबातील सौदागर नागनाथ शिंदे यांच्या आयुष्यावर निसर्गाच्या अवकृपेने मोठे संकट कोसळले आहे....

सिद्धेश्वर तलावातील दूषित पाण्याने माशांचा जीव धोक्यात; मृत मासे खाण्यासाठी कावळ्यांची गर्दी, नागरिकांचा संतप्त सवाल

सिद्धेश्वर तलावातील दूषित पाण्याने माशांचा जीव धोक्यात; मृत मासे खाण्यासाठी कावळ्यांची गर्दी, नागरिकांचा संतप्त सवाल   सोलापूर : प्रतिनिधी शहरातील ऐतिहासिक सिद्धेश्वर तलाव परिसरात दूषित पाणी आणि...

spot_img

ताज्या बातम्या

error: Content is protected !!