spot_img
spot_img
spot_img
spot_img
  1. विरोधातून सत्तेत; वैभव हत्तुरेंना लॉटरी
  2. सोलापूर महापालिकेत राष्ट्रवादीला मिळणार वाटा
  3. सोलापूर : प्रतिनिधी
  4.  सोलापूर महापालिकेत स्पष्ट बहुमत मिळवलेल्या भाजपने आता राष्ट्रवादी कॉंग्रेस पक्ष (अजितदादा गट) यांनाही सत्तेत सहभागी करून घेण्याचा निर्णय घेतला आहे. त्यामुळे राष्ट्रवादीचे एकमेव निवडून आलेले नगरसेवक वैभव हत्तुरे हेही आता महापालिकेच्या सत्तेचा भाग असणार आहेत. त्यांना ही एकप्रकारे लॉटरी लागल्याचे बोलले जात आहे.

महापालिका निवडणुकीत भाजपने 87 नगरसेवक निवडून आणत एकहाती सत्ता मिळवली होती. तर राष्ट्रवादीकडून केवळ वैभव हत्तुरे हे एकमेव नगरसेवक निवडून आले होते. राज्याप्रमाणे सोलापुरातही भाजप आणि राष्ट्रवादी हे विरोधात लढले होते. मात्र निवडणुकीनंतर राज्य पातळीवर झालेल्या वरिष्ठ नेत्यांच्या बैठकीत सोलापूर विषयी चर्चा झाली. वरिष्ठ नेत्यांनी राष्ट्रवादीला सत्तेत सहभागी करून घेण्याचा निर्णय घेतला.

 

सोलापूरचे पालकमंत्री जयकुमार गोरे यांनी रविवारी वैभव हत्तुरे यांना चर्चेसाठी आमंत्रित केले होते. या बैठकीत शहरातील विकासकामे, प्रलंबित प्रश्न तसेच निधी वाटपाबाबत सविस्तर चर्चा झाली. हत्तुरे यांना भाजप नगरसेवकांप्रमाणेच समान निधी देण्याचे तसेच सत्तेतील समित्यांमध्ये योग्य प्रतिनिधित्व देण्याचे आश्वासन पालकमंत्री जयकुमार गोरे यांनी दिले. या निर्णयामुळे स्थायी समितीच्या निवड प्रक्रियेत वैभव हत्तुरे यांना यंदाच संधी मिळते की त्यांचा क्रमांक पुढील वर्षी लागतो, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

 

 

पालकमंत्री जयकुमार गोरे यांच्याशी भेट झाली आहे. राष्ट्रवादीचे शहराध्यक्ष संतोष पवार यांच्याशी चर्चा झाली आहे. त्यांचे वरिष्ठ पातळीवर बोलणे झाले आहे. पालकमंत्र्यांनी राष्ट्रवादी सत्तेचा भाग असल्याचे सांगितले आहे.

 

वैभव हत्तुरे, नगरसेवक

 

मुख्य संपादक : दत्ता सुरवसे

Related Articles

महाराष्ट्र विद्यालय बार्शीचे एन एम एम एस परीक्षेत घवघवीत यश

*महाराष्ट्र विद्यालय बार्शीचे एन एम एम एस परीक्षेत घवघवीत यश*   मंगळवार दिनांक २४ फेब्रुवारी २०२६ रोजी एन.एम.एम.एस. परीक्षेचा निकाल जाहीर झाला असून, महाराष्ट्र विद्यालय बार्शी...

अक्षय तृतीयेपूर्वी बसवेश्वर महाराजांचा पुतळा बसवण्याचे निर्देश

अक्षय तृतीयेपूर्वी बसवेश्वर महाराजांचा पुतळा बसवण्याचे निर्देश   सोलापूर : महापौर श्री. विनायक कोंड्याल यांनी आज महात्मा बसवेश्वर महाराज पुतळा परिसराची प्रत्यक्ष पाहणी करून सुरू असलेल्या...

spot_img

ताज्या बातम्या

error: Content is protected !!