spot_img
spot_img
spot_img
spot_img

समतावादी अनुभव मंटप

बसवेश्वर महाराजांनी मंगळवेढात असताना समतेचे विचार जनसामान्यात रुजवून त्यांनी बरेच असे शिष्यगण निर्माण केले आणि तत्यांनी समाजातील सर्व जाती नष्टकरून एकच मानवतावाद निर्माण करावयाचा होता आणि त्यासाठी त्यांनी कंगाल विषमतावादी वैदिक धर्माच्या अंधकारात बुडलेल्या त्या समाजाला बाहेर काढायचे होते आणि त्याचमुळे त्यांना प्रत्येकांच्या मनातील देव जागृत करण्यासाठी इष्टलिंग पर्याय निर्माण केला होता .

 

☘️आणि नवीन विचारावर सर्व विद्वानांना एकत्र बसून प्रत्येकांच्या अनुभवावर चर्चा घडवत असतात आणि सर्वांच्या मते सत्य वचन तयार करून ते लोकांना आचरणात यावे व त्याच्यावर संस्कार करण्यासाठी विचार मंचावर चर्चा केली.

 

☘️आणि नंतर सभा मंटपाची गरज भासू लागल्यामुळे त्याच्यासाठी लागणारा निधी कुणालाही न मागता बसवेश्वर महाराजांनी सभामंटप बांधण्याचे ठरवले आणि महात्मा बसवेश्वर हे महामंत्री होते आणि त्यांच्या दोन्ही राण्या म्हणजे गंगाबिका व निलंबिका.

यांना त्यांच्या वडिलोपार्जित संपत्ती मिळाली होती आणि त्याच संपत्तीतून त्यांनी बसवेश्वर महाराजांनी अनुभव मंटप उभारले .

 

बसवेश्वरांनी निर्माण केलेले मुक्त आणि परिवर्तनवादीचे एक शक्ती पीठच होते.

 

या अनुभव मंडपाचे अध्यक्ष बसवेश्वर हे स्वतः होते.

 

ज्ञानयोगी अल्लम प्रभुंना अध्यक्ष केले आणित्यांना शून्यपिठाधीश्वर पण म्हणतात.

 

☘️कारण आलमप्रभू त्या काळाची विद्वान पंडित होते.

 

☘️शून्य पिठाधीश्वर अल्लम प्रभू चे अध्यक्ष ते खाली अनुभव मंडपात सर्व जाती धर्माचे 700 शरण व 70 शरणम्मा आणि एक लाख 96 हजार अनुयायी जमले होते महामेळाव्यासाठी.

 

आणि या चर्चेतूनच मानवतावादी समतेचे वचने तयार करण्यात आले.

 

सत्य म्हणजे शिवधर्माचा लिंगायत शिष्य होईल आणि तो आता कोणत्याही जातीचा न राहता मानवतावादी विचाराचा होईल तो स्वतः स्वतःच्या श्रमावर जगेन फुकटचे खाणार नाही, नेहमी सदाचाराने वागेल.

 

कायक आणि दासोह वचनाची काटेकोरपणे जीवनात अमल करणे हे प्रत्येक शरण आणि शरणमांना बंदनकारक राहील अशी शिकवण देण्यात येत असे.

 

☘️बसवेश्वर महाराज म्हणतात….

दगड मातीचे मानव निर्मिती हे जमिनीला एक भारच आहेत आणि ते आपण जाणून घेतले पाहिजे आपण अशांना कधीही बळी पडले नाही पाहिजे आणि स्वतःला शुद्ध व्हायचे असेल तर शुद्धच कामे आपण केली पाहिजे तुमची दुःख कमी होईल त्यासाठी चोरी करू नका तुम्ही खोटे बोलू नका कोणाची हत्या करू नका आत्मस्तुती करू नका किंवा परनिंदा करू नका कोणालाही दोष देऊ नका कोणालाही रागवू नका तरच काय होईल तुमची दुःख मुक्त होईल अशी शिकवण देत असते.

 

☘️कोणालाही मागून काहीच मिळणार नाही आणि तीर्थयात्रा पण करून काही मिळणार नाही जर आपण पैसा विनाकारण खर्च जर झाला तर काय होईल दारिद्र्य बनतो जर तोच वेळ आणि जर पैसा आपल्या मुलांवर शेतीवर शिक्षणावर खर्च केला तर तुम्हीच काय होता सुखी होतात.

 

☘️अशा सरळ आणि सोप्या भाषेत विचार सांगून शेतकरी जागृती केली त्यांच्यातील जी अंधश्रद्धा होती ती दूर केली.

Related Articles

महाराष्ट्र विद्यालय बार्शीचे एन एम एम एस परीक्षेत घवघवीत यश

*महाराष्ट्र विद्यालय बार्शीचे एन एम एम एस परीक्षेत घवघवीत यश*   मंगळवार दिनांक २४ फेब्रुवारी २०२६ रोजी एन.एम.एम.एस. परीक्षेचा निकाल जाहीर झाला असून, महाराष्ट्र विद्यालय बार्शी...

अक्षय तृतीयेपूर्वी बसवेश्वर महाराजांचा पुतळा बसवण्याचे निर्देश

अक्षय तृतीयेपूर्वी बसवेश्वर महाराजांचा पुतळा बसवण्याचे निर्देश   सोलापूर : महापौर श्री. विनायक कोंड्याल यांनी आज महात्मा बसवेश्वर महाराज पुतळा परिसराची प्रत्यक्ष पाहणी करून सुरू असलेल्या...

spot_img

ताज्या बातम्या

error: Content is protected !!