spot_img
spot_img
spot_img
spot_img

झाडाची मुळे ही निसर्गाची बिनाखर्चाची पाईपलाईन असते.

♦️झाडाची मुळे ही निसर्गाची बिनाखर्चाची पाईपलाईन असते.

 

१) एक कडूनिंबाचे झाड, दहा हजार लिटर पाणी संपूर्ण पावसाळ्यात जमिनीत घेऊन जाऊ शकते. याचा अर्थ, आपल्या परिसरात किमान ३० झाडं निंब, चिंच, जांभळ, आंबा, मोह, अर्जुन या वर्गातील नक्कीच असावीत.

 

म्हणजे, मृत साठ्याचे पाणी पाझरत रहाते.

 

२) एक वडाचे किंवा पिंपळाचे मोठे झाड, एका हंगामात एक कोटी लिटर पाणी जमिनीत घेऊन जाते. [आणि ते ही पन्नास फुटाच्या ही खाली. वडाची व पिंपळाचे मुळे पाषाणालाही भेदून ८०० ते १००० फुटावर पोचतात.]

 

३) एक कोटी लिटर म्हणजे एका सर्वसाधारण घरगुती विहीरीचा शंभर वेळा उपसा करावा एवढे पाणी. याचा गणितीय हिशोब सांगायचा झाला तर ३५ एकर शेतीचे रब्बी हंगामाचे भरणपोषण होते आणि वर्षभर बागायतीसाठी १५ एकरला पुरेल एवढे जिवंत साठ्याचे पाणी एक वड किंवा पिंपळ पुरवतो.

 

४) म्हणून आपल्या शेताच्या शेजारी मोकळी पडीक जागा असेल तर किमान एक असा महावृक्ष लावा.

 

५) आपण एका बोअरवेलसाठी लाखात खर्च करतो. एका विहीरीसाठी कितीतरी लाख खर्च करतो. पण पाण्याची कुठलीच शाश्वती नाही.

 

झाडाचे महत्व जाणाल, तर तुमचं महत्व वाढेल…!

 

झाडे लावा निसर्ग वाचवा.

 

दक्षता उपसंपादक:राजन क्षत्रिय

Related Articles

महाराष्ट्र विद्यालय बार्शीचे एन एम एम एस परीक्षेत घवघवीत यश

*महाराष्ट्र विद्यालय बार्शीचे एन एम एम एस परीक्षेत घवघवीत यश*   मंगळवार दिनांक २४ फेब्रुवारी २०२६ रोजी एन.एम.एम.एस. परीक्षेचा निकाल जाहीर झाला असून, महाराष्ट्र विद्यालय बार्शी...

अक्षय तृतीयेपूर्वी बसवेश्वर महाराजांचा पुतळा बसवण्याचे निर्देश

अक्षय तृतीयेपूर्वी बसवेश्वर महाराजांचा पुतळा बसवण्याचे निर्देश   सोलापूर : महापौर श्री. विनायक कोंड्याल यांनी आज महात्मा बसवेश्वर महाराज पुतळा परिसराची प्रत्यक्ष पाहणी करून सुरू असलेल्या...

spot_img

ताज्या बातम्या

error: Content is protected !!