भारताच्या जनजाती बांधवांच्या स्वाभिमानासाठी आयुष्यभर लढा देणारे आदिवासी अस्मितेचे महानायक, भगवान बिरसा मुंडा. यांचे शौर्य, बलिदान आणि राष्ट्रभक्ती भारतीय इतिहासातील अमर दीपस्तंभ आहेत.
देशाचे यशस्वी नेतृत्व करणारे भारताचे प्रधानमंत्री श्री. नरेंद्र मोदीजी यांच्या मार्गदर्शनाखाली देशभरात जनजाती गौरव दिवस भव्यदिव्य स्वरूपात साजरा केला जात आहे, ही प्रत्येक भारतीयासाठी अभिमानाची बाब आहे.
या भव्य अभियानासाठी धोरणात्मक दिशा आणि नेतृत्व देणाऱ्या केंद्रीय गृहमंत्री श्री. अमित शहाजी, राष्ट्रीय अध्यक्ष श्री. जे. पी. नड्डा जी, मुख्यमंत्री श्री. देवेंद्र फडणवीस जी, भाजपा महाराष्ट्र प्रदेशाध्यक्ष श्री. रवींद्रजी चव्हाण, तसेच मंत्री श्री. चंद्रशेखर बावनकुळे जी यांनी माझी प्रदेश अभियान प्रभारी नियुक्ती केल्याबद्दल मी मन:पूर्वक आभार व्यक्त करतो.
भगवान बिरसा मुंडा यांची राष्ट्रनिष्ठा, त्यांची धगधगती लढाऊ वृत्ती, आणि जनजाती समाजाच्या अधिकारांसाठीची अटळ भूमिका प्रत्येकांसाठी प्रेरणा आहे.
या अभियानाची मला मिळालेली जबाबदारी अत्यंत निष्ठेने, कार्यकर्त्यांच्या बळावर आणि पक्षाच्या मार्गदर्शनाखाली यशस्वीपणे पार पाडण्याचा मी दृढ संकल्प करतो.






