spot_img
spot_img
spot_img
spot_img

अंबानींच्या लग्नात फक्त २ मराठी कलाकारांना निमंत्रण, त्यांनीही पाठ फिरवली? चर्चांना उधाण!

अंबानी कुटुंबाच्या भव्य विवाह सोहळ्यात बॉलिवूडमधील अनेक दिग्गजांनी हजेरी लावली, मात्र मराठी कलाकारांच्या उपस्थितीबद्दल सोशल मीडियावर जोरदार चर्चा सुरू आहे. विशेषतः श्रेयस तळपदे आणि अमृता खानविलकर यांना निमंत्रण मिळाल्याचे त्यांनी सोशल मीडियावर जाहीर केले होते. श्रेयसने तर निमंत्रण पत्रिका शेअर करत “आता लग्नाला जावं लागेल” असे मजेशीर कॅप्शन दिले होते, तर अमृतानेही तिच्या निमंत्रण पत्रिकेचे फोटो शेअर केले होते.

तरीही, या शाही सोहळ्याचे जे अनेक व्हिडिओ आणि फोटो समोर आले, त्यापैकी कशामध्येही श्रेयस आणि अमृता दिसले नाहीत. आश्चर्याची बाब म्हणजे, या दोघांनीही त्यांच्या सोशल मीडिया अकाऊंटवर सोहळ्याचे कोणतेही फोटो किंवा अपडेट्स शेअर केलेले नाहीत.

सोशल मीडियावर प्रश्नांची सरबत्ती

यामुळे सोशल मीडियावर मराठी कलाकारांना निमंत्रण न मिळाल्याने, किंवा मिळालं असूनही ते गैरहजर राहिल्याने अनेक प्रश्न उपस्थित केले जात आहेत. एका नेटकऱ्याने ‘एक्स’ (पूर्वीचे ट्विटर) वर पोस्ट करत म्हटले आहे की, “शाही विवाह सोहळ्यात मराठी कलाकारांना निमंत्रण असूनही त्यांनी पाठ फिरवली, की ते पॅप्सच्या कॅमेऱ्यातून कसे सुटले हा प्रश्न नक्की पडतो… त्यामुळे नक्की काय घडलंय, या प्रश्नाचं उत्तर सध्या अनेकजण शोधत आहेत.”

या संपूर्ण प्रकारामुळे मराठी चित्रपटसृष्टी आणि अंबानींच्या सोहळ्यातील मराठी कलाकारांच्या उपस्थितीबद्दलचे गूढ अधिकच वाढले आहे.

Related Articles

सोलापूरकरांनी जाणून घेतला भुईकोट किल्ला!

सोलापूरकरांनी जाणून घेतला भुईकोट किल्ला! -- इको फ्रेंडली क्लबकडून पर्यटन दिनाच्या निमित्ताने भटकंती -- सोलापूर : सोलापुरात अनेक वर्ष राहून सुद्धा आम्ही कधीच भुईकोट किल्ला पाहिला नव्हता! आज...

माऊली लाॅन्स व माऊली उद्योग समूह व माऊली परिवार यांच्या वतीने तुळजापूरला पाई चालत जाणाऱ्या भाविक भक्तांसाठी बावी फाटा या ठिकाणी 15 ते 20...

माऊली लाॅन्स व माऊली उद्योग समूह व माऊली परिवार यांच्या वतीने तुळजापूरला पाई चालत जाणाऱ्या भाविक भक्तांसाठी बावी फाटा या ठिकाणी 15 ते 20...
spot_img

ताज्या बातम्या

error: Content is protected !!